सचिनकुमार विश्राम तायडे - लेख सूची

स्वप्न

समाजवादी धर्मनिरपेक्ष–लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर भेदाभेदाचा उत्कलनांक जाळून टाकतो कित्येकांना कुणाही सौंदर्यवतीच्या गालावरचा तीळ महत्त्वाचा नाहीये उपयुक्त आहे आरक्षणाचा बिंदू प्रेमीजनांचा होकार किंवा नकार, एकत्रीकरण किंवा अलगीकरण यापेक्षा खळबळजनक आहे वाढत जाणारं खाजगीकरण अर्थात, संधीच्या समानतेचं विस्थापन एक स्वप्न पेरू लोकशाहीच्या छातीवर मग होईल या मातीवर मानवतेच्या उदारीकरणाचं उद्घाटन, धर्मांध आणि जातींचं उच्चाटन समानतेची व न्यायाची उजळून …

यार… बोल, लिही

हल्ली तू बोलत नाहीस मोकळेपणानंशब्दांतूनही व्यक्त होणं टाळतोयसतुझ्या मनातलं खदखदणारंलाव्हारसाचं वादळतुझ्या चेहऱ्यावर अंकित झालंय एरव्ही तुझ्या वाणीची धार सपासप वार करते हिणकस, बिभत्स, अविवेकी कोशांना फाडत राहते यार .. मग आता तू काएवढा शांत आणि लालबुंद? हिरवं गवत जळू नये आभाळानं छळू नये अशावेळी खरं तर कुणीच मूग गिळू नये ही वेळ मौन धारणाची नाही …